कितीही दाबा, बटन दाबलंच जा नव्हतं… मुंबईत EVM मध्ये बिघाड; ठाकरे सेनेच्या उमेदवार…

कितीही दाबा, बटन दाबलंच जा नव्हतं… मुंबईत EVM मध्ये बिघाड; ठाकरे सेनेच्या उमेदवार…

भीमराव गवळी | Updated on: Jan 15, 2026 | 11:07 AM

मुंबईतल्या बालमोहन विद्यामंदिरमध्ये एका EVM मध्ये बिघाड झाल्याचा प्रकार घडला आहे. 20 मिनिटं मतदानाची प्रकिया थांबवली होती. मतदान प्रकिया थांबवल्यामुळे मतदारांची मोठी गैरसोय झाली आहे.

राज्यात 29 महानगरपालिकांमध्ये आज निवडणुका पार पडत आहेत. प्रत्येक नागरिक मतदानाचा हक्क बजावतोय. मुंबईतल्या बालमोहन विद्यामंदिरमध्ये एका EVM मध्ये बिघाड झाल्याचा प्रकार घडला आहे. 20 मिनिटं मतदानाची प्रकिया थांबवली होती. मतदान प्रकिया थांबवल्यामुळे मतदारांची मोठी गैरसोय झाली आहे.उमेदवार विशाखा राऊत यांच्या नावासमोरचं बटण दाबलं जात नाही, अशी तक्रार मतदारांनी केली. मात्र मतदारांच्या तक्रारीनंतर EVM मशीन बदलण्यात आले. आणि मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

Published on: Jan 15, 2026 11:07 AM