ITR Filing : आयटीआर रिटर्नसाठी 15 मार्चपर्यंत मुदतवाढ

| Updated on: Jan 11, 2022 | 11:05 PM

केंद्र सरकारनं इनकम टॅक्स रिटर्न फाईल (ITR filing) करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे. आधी ही तारीख 31 डिसेंबर 2021 पर्यंत होती.

Follow us on

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं इनकम टॅक्स रिटर्न फाईल (ITR filing) करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे. आधी ही तारीख 31 डिसेंबर 2021 पर्यंत होती. त्यामुळे आता 15 मार्चपर्यंत करदाते आपला रिटर्न फाईल करु शकतात. 31 डिसेंबरनंतर असं मानलं जात होतं की सरकारकडून आयटी रिटर्न फाईल करण्याची तारीख (ITR filing last date) वाढवली जाईल. कारण कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक लोक आयटी रिर्टन फाईल करु शकले नव्हते. आता सरकारने अशा लोकांना मोठा दिलासा दिला आहे.