सोलापूरमध्ये शिंदे गटाला धक्का; दादा पवार यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

सोलापूरमध्ये शिंदे गटाला धक्का; दादा पवार यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

| Updated on: Jan 11, 2026 | 1:17 PM

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाचे सह संपर्क प्रमुख दादा पवार हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत गेलेत. शेकडो कार्यकर्त्यांसह दादा पवार यांनी ठाकरे गटात पक्ष प्रवेश केलाय.

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाकडून जोरदार प्रचार सुरु आहेत. ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत सोलापूरमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाचे सह संपर्क प्रमुख दादा पवार हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत गेलेत. शेकडो कार्यकर्त्यांसह दादा पवार यांनी ठाकरे गटात पक्ष प्रवेश केलाय. ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यावर घरी आल्यासारखं वाटतंय असं दादा पवार म्हणाले. आत्ताच्या घडीला एकनाथ शिंदे हा धक्का पचवू शकतील का? असा सवाल उपस्तिथ होतोय.

Published on: Jan 11, 2026 01:16 PM