Gulabrao Patil: गुलाबराव पाटलांचं पहिल्यांदाच थेट उत्तर, ‘त्यांनी वर्षा सोडलं, सगळं सोडलं पण शरद पवारांना काही सोडत नाहीत’

| Updated on: Jun 29, 2022 | 12:26 PM

शिवसेनेचे बंडखोर मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेला टोला लगावत नाराजी व्यक्त केलीय. बंडखोर आमदारांची गुवाहाटीत बैठक झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली असून बंडखोर आमदारांनी आपलं मत या बैठकीत मांडलं.

Follow us on

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी गुवाहीतील बैठकीत शिवसेनेला टोला लगावलाय. यावेळी बैठकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह सर्व बंडखोर आमदार उपस्थित होते. यावेळी पाटील म्हणाले की, त्यांनी वर्षा बंगला सोडला, त्यांनी आम्हाला 52 आमदारांनाही सोडलं, पण ते काही शरद पवारांना सोडायला तयारी नाहीत, अशी नाराजी त्यांनी व्यक्त कोलीय. यावेळी गुलाबराव पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेत केलेल्या संघर्षाविषयी देखील सांगितलं. जेलमध्ये गेल्याची आठवण आणि 1992च्या दंगलीची आठवण देखील त्यांनी करून दिली. दरम्यान, राज्यात चाललेला सत्तासंघर्षाच्या मुद्द्यावर गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य चांगलंच चर्चेत आलंय. पहिल्यांदा त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.