Vikram Misri : …म्हणून दहशतवाद्यांनी पहलगामवर केला हल्ला, परराष्ट्र सचिवांनी थेट सांगितलं

Vikram Misri : …म्हणून दहशतवाद्यांनी पहलगामवर केला हल्ला, परराष्ट्र सचिवांनी थेट सांगितलं

| Updated on: May 07, 2025 | 11:55 AM

भारतीय सेनेने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. त्यामध्ये 9 दहशतवादी तळांना लक्ष्य करत ज्यामध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांना ठार केले. या कारवाईनंतर सेनेकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली.

ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर सेनेकडून महत्वाची पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी या ऑपरेशनसंदर्भात आणि पहलगाम हल्ल्यावर भाष्य केले.”२२ एप्रिल रोजी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित पाकिस्तानी प्रशिक्षित दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर एक क्रूर हल्ला केला. त्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला. २००८ च्या मुंबईत झालेल्या २६\११ च्या हल्ल्यानंतर हा हल्ला सर्वात गंभीर घटना आहे.”, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी म्हटले. तर पहलगाम हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ म्हणजेच रेझिस्टन्स फ्रंट नावाच्या गटाने घेतली आहे. हा गट लष्कर-ए-तोयबाशी संबधित आहे. पहलगाम हल्ल्याच्या तपासात दहशतवाद्यांशी पाकचे संबंध उघड झालेत, असेही सचिव विक्रम मिस्री म्हणाले. तर भारताच्या विरोधात हल्ले होतील हे आम्हाला गुप्तचर यंत्रणांकडून कळलं होतं. भारतावर पुन्हा हल्ले होतील अशी गुप्त माहिती मिळाली होती. त्यामुळे हे रोखणं आवश्यक होतं तर काश्मीरचा विकास रोखण्यासाठी दहशतवाद्यांनी हल्ला केला असल्याचे विक्रम मिस्री यांनी यावेळी सांगितले.

Published on: May 07, 2025 11:55 AM