Ravindra Dhangekar Video : काँग्रेसच्या धंगेकरांना धक्का, नव्या टीममधून डावललं; एकनाथ शिंदेंची भेट घेणं भोवलं?

Ravindra Dhangekar Video : काँग्रेसच्या धंगेकरांना धक्का, नव्या टीममधून डावललं; एकनाथ शिंदेंची भेट घेणं भोवलं?

| Updated on: Feb 21, 2025 | 2:01 PM

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी नियुक्त केलेल्या नव्या टीममध्ये रवींद्र धंगेकर यांना डावललण्यात आलं आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या टीमममधून माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना वगळण्यात आल्याने हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलानंतर पुणे शहराध्यक्ष बदलाची चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वी सुरू होती. अशातच काँग्रेसचे प्रेदशाध्यक्ष बदलताच काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना धक्का बसल्याचे दिसतंय. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी नियुक्त केलेल्या नव्या टीममध्ये रवींद्र धंगेकर यांना डावललण्यात आलं आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या टीमममधून माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना वगळण्यात आल्याने हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी शहरातील नवी टीम जाहीर केली आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याकडून जाहीर करण्यात आलेल्या नव्या टीममध्ये रमेश बागवे, अभय छाजेड, दीप्ती चौधरी यांचा समावेश असणार आहे. मात्र यामधून माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना डावललण्यात आल्याचे दिसून येत आहे. यानंतर रवींद्र धंगेकर यांनी घेतलेली एकनाथ शिंदे यांची भेट त्यांना भोवली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर काही कामानिमित्ताने रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी घेतलेली एकनाथ शिंदे यांची भेट त्यांना भोवल्याची चर्चा सध्या शहरात रंगतेय.

Published on: Feb 21, 2025 02:01 PM