सोडून गेले त्यांनी गुरू बदलले – चंद्रकांत खैरे
"दरवर्षी आम्ही मातोश्रीवर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मोठ्या साहेबांना वंदन करायला यायचो. आज मोठे साहेब नाहीत, पण आमचे उद्धव साहेब आहेत" असं शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे म्हणाले.
मुंबई: “दरवर्षी आम्ही मातोश्रीवर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मोठ्या साहेबांना वंदन करायला यायचो. आज मोठे साहेब नाहीत, पण आमचे उद्धव साहेब आहेत” असं शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे म्हणाले. “सुरुवातीला मी, आनंद दिघे आणि शिशिर शिंदे आम्ही तिघांनी मिळून मातोश्रीवर गुरुपौर्णिमा सुरु केली” असं ते म्हणाले. “आज अनेक शिवसैनिक येत आहेत. साहेबांच पूजन करतात. एकही माणूस कमी झालेला नाही, जबरदस्त माहोल आहे” असं चंद्रकांत खैरे म्हणाले.
Published on: Jul 13, 2022 04:24 PM
