संभाजीराजे त्यांच्या यु टर्नवर, गौतमी असं काय म्हणाली की?

संभाजीराजे त्यांच्या यु टर्नवर, गौतमी असं काय म्हणाली की?

| Updated on: May 31, 2023 | 8:59 AM

राष्ट्रवादीच्या एक खासदार आणि आमदारानं तिची बाजू घेतली आहे. तर ठाकरे गटही आता तिला सपोर्ट करताना दिसत आहे. यामध्येच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आधी तिला पाठिंबा देत सर्वांनी गौतमी पाटील यांच्यामागे उभं राहिलं पाहिजे. कलाकाराला संरक्षण मिळालंच पाहिजे मी याच मताचा आहे असं म्हटलं होतं.

पुणे : नृत्यांगणा गौतमी पाटील ही तिच्या नृत्य आणि तिच्या कार्यक्रमातील होणाऱ्या वादामुळे भलतीच चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसापासून फक्त वाद आणि आयोजकांवर गुन्हे नोंद होत आहे. त्यातच आता तिच्या आडनावाचा वाद राज्यभर घोंगावत आहे. यावरून थेट तिच्या समर्थनार्थ तर कोण विरोधात दिसत आहे. राष्ट्रवादीच्या एक खासदार आणि आमदारानं तिची बाजू घेतली आहे. तर ठाकरे गटही आता तिला सपोर्ट करताना दिसत आहे. यामध्येच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आधी तिला पाठिंबा देत सर्वांनी गौतमी पाटील यांच्यामागे उभं राहिलं पाहिजे. कलाकाराला संरक्षण मिळालंच पाहिजे मी याच मताचा आहे असं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी त्यांच्या या वक्तव्यावरून माघार घेतली. तसेच एक ट्वीट करून म्हटलं आहे की, “अशा कलेला नको रे बाबा संरक्षण” असंही म्हटलं. यावरून आता गौतमी पाटील हिने प्रतिक्रिया दिली आहे. तिने राजेंबद्दल मला माहित नाही. मी बघून आपल्याला पुढे सांगेन. पण त्यांच्याबाबत मी काही बोलू शकत नाही. त्यांना मी सुद्धा मानते. पण कार्यक्रमात अश्लील झालं असतं तर कार्यक्रमाला मी आले नसते. आधी बघा मग बोला”, अशी भूमिका गौतमी पाटील हिने मांडली.

Published on: May 31, 2023 08:59 AM