GD Bakshi on Pakistan : अणुबॉम्बची धमकी देणं सोप्प आहे, पण.. ; पाकिस्तानबद्दल जी. डी. बक्षींचा मोठा दावा
Pakistan seeks China help : पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून घेण्यात आलेल्या कठोर निर्णयावर पाकिस्तानकडून जळफळाट व्यक्त केला जात आहे. त्यावर जी. डी. बक्षी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अणुबॉम्बची धमकी देणं सोप्प आहे, पण पाकिस्तानला तो वापरता येणार नाही, असं जी. डी. बक्षी यांनी म्हंटलं आहे. भारताला घाबरून पाकिस्तान त्याचा आका चीनकडे गेला असल्याचं देखील यावेळी बक्षी यांनी सांगितलं. पाकिस्तान भारताला प्रचंड घाबरला आहे. भारताने आता रणनीती आखून चारही बाजूंनी पाकिस्तानवर हल्ला करावा, असंही ते म्हणाले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानची सर्व स्तरांवर कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या अनुषंगाने भारताने काही कठोर निर्णय देखील घेतलेले आहेत. त्यामुळे पाकिस्तान घाबरून चीनची मदत घेण्यासाठी गेलेला असल्याचं बोललं जात आहे.
Published on: Apr 29, 2025 02:23 PM
