Ghatkopar Hoarding Collapse : 14 जीव गेलं पण अनधिकृत होर्डिंग लावणारा भावेश भिंडे कुठं लपला?

| Updated on: May 15, 2024 | 10:27 AM

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळून १४ जणांचा मृत्यू... बेकायदेशीर होर्डिंग लावणारा इगो मीडिया कंपनीचा मालक भावेश भिंडे मात्र फरार आहे. तर भाजपच्या मीडिया सेलने उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणारा भावेश भिंडेचा फोटो शेअर करत मुख्यमंत्री असताना टक्केवारी घेऊन परवनागी दिल्याचा आरोप केलाय.

मुंबईत वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला तर ८० हून अधिक जण जखमी आहेत. त्या १४ जणांच्या घरातील आक्रोश अद्याप थांबलेला नाही तर इकडे राजकारण सुरू झालंय. तर बेकायदेशीर होर्डिंग लावणारा इगो मीडिया कंपनीचा मालक भावेश भिंडे मात्र फरार आहे. तर भाजपच्या मीडिया सेलने उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणारा भावेश भिंडेचा फोटो शेअर करत मुख्यमंत्री असताना टक्केवारी घेऊन परवनागी दिल्याचा आरोप केलाय. अशातच मंत्री छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांचा काय दोष? असं म्हणत ते ठाकरेंच्या बाजूने उभे राहिलेत. दरम्यान, बेकायदेशीर होर्डिंग लावणाऱ्या भावेश भिंडे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण पोलीस त्याच्या घरी पोहोचायच्या आत तो फरार झाला. बघा नेमक काय घडलं?

Published on: May 15, 2024 10:27 AM