Mumbra Crime News : चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक

Mumbra Crime News : चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक

| Updated on: Apr 09, 2025 | 4:35 PM

मुंब्रा येथे 10 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिला इमारतीतून खाली फेकून देत तिची हत्या करण्यात आलेली आहे. यावर आज पुन्हा नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन सुरू केलं आहे.

मुंब्रा पोलिस ठाण्याबाहेर नागरिकांनी मोर्चा आणला आहे.  मुंब्रा येथे 10 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिला इमारतीतून खाली फेकून देत तिची हत्या करण्यात आलेली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपीला शिक्षा व्हावी या मागणीसाठी कालपासून मुंब्रा येथील नागरिक आंदोलन आणि मोर्चे काढत आहेत. आज दुपारी पुन्हा एकदा मुंब्रा पोलिस ठाण्याबाहेर नागरिकांनी आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी मोर्चा काढला.  या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे. त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, काल रात्री देखील आरोपीच्या अटकेसाठी जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता.

Published on: Apr 09, 2025 04:35 PM