भर उन्हाळ्यात गारवा, ‘या’ जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस
VIDEO | बळीराजा पुन्हा चिंतेत..., धान पिकासग फळबागांना नुकसानीची शक्यता, 'या' जिल्ह्याला पुन्हा ऑरेंज अलर्ट
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात मध्यरात्री विजेच्या गडगडाटासह जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली. भर उन्हाळ्यात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र मध्यरात्री जोरदार हवेसह अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. गोंदिया जिल्ह्यात धान पीक आणि फळबागांना सुद्धा नुकसानीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, हवामान खात्याकडून आज पुन्हा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यातील भारतीय हवामान खात्याने वर्तविला अंदाज खरा ठरत असून जिल्ह्यात पुन्हा मध्यरात्री पावसाचे जोरदार वाऱ्यासह आणि विजेच्या गडगडाटसह अनेक ठिकाणी आगमन झाले. अवकाळी पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रात्री अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याचे पाहायला मिळाले. या पावसामुळे धान पिकासह मका, गहू , आंबा, सूर्यफूल, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याचे शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि आज पुन्हा जिल्हामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याने शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे.
