Haribhau Bagade : हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
Haribhau Bagade Accident : राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊनाना बागडे यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. यावेळी पायलटच्या सतर्कतेमुळे वेळीच हेलिकॉप्टर खाली उतरवण्यात आल्याने बागडे थोडक्यात बचावले.
राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे हे काल अपघातापासून थोडक्यात बचावले आहेत. हरीभाऊ बागडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. हेलिकॉप्टरमधून धूर निघाल्याने हेलिकॉप्टर पुन्हा खाली उतरवण्यात आलं. पाली येथून हेलिकॉप्टर उड्डाण करत असताना हा अपघात झाला. या संपूर्ण अपघाताचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक स्फोट झाला. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमरास घडली. पाली येथून हेलिकॉप्टरने उड्डान घेत असताना ही घटना घडली. हेलिकॉप्टरच्या मागच्या भागात स्फोट झाला. स्फोट होताच धूर निघू लागला. स्फोट झाल्याचे लक्षात घेता पायलटने तात्काळ हेलिकॉप्टरचे सुरक्षित लँडिंग केले. त्यामुळे सुदैवाने या अपघातामध्ये पायलटसह हरिभाऊ बागडे थोडक्यात बचावले.
Published on: Mar 30, 2025 11:55 AM
