Ashish Shelar | महाराष्ट्र बंदीवान केल्याचा रेकॉर्ड ठाकरे सरकारच्या नावावर केला जाईल : आशिष शेलार

Ashish Shelar | महाराष्ट्र बंदीवान केल्याचा रेकॉर्ड ठाकरे सरकारच्या नावावर केला जाईल : आशिष शेलार

| Edited By: | Updated on: Sep 01, 2021 | 3:31 PM

दहीहंडी साजरी केली म्हणून अनेक गोविंदांची पोलिसांनी धरपकड आणि अटक केली आहे. या कारवाईवर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी संताप व्यक्त केला आहे. अटक, धरपकड करायला गोविंदा काय लादेन आहे का?, असा संतप्त सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

दहीहंडी साजरी केली म्हणून अनेक गोविंदांची पोलिसांनी धरपकड आणि अटक केली आहे. या कारवाईवर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी संताप व्यक्त केला आहे. अटक, धरपकड करायला गोविंदा काय लादेन आहे का?, असा संतप्त सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. काल दिवसभर गोविंदाला नोटीस काय, धरपकड काय, बलाचा वापर काय, अटक काय, या सगळ्या गोष्टीचा काल महाराष्ट्रात आणि मुंबईत घडल्या. जणू काही सुलतानी पद्धतीचा कारभार सुरु होता. ज्यावेळी सचिन वाझेचा प्रश्न सभागृहात आम्ही मांडला, करोडोंची वसुली केल्यानंतर ज्यावेळी आम्ही प्रश्न उपस्थित केला, तेव्हा सचिन वाझे लादेन आहे काय? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला होता. आज आमचा मुख्यमंत्र्यांनाही तोच सवाल आहे. अटक, धरपकड करायला गोविंदा काय लादेन आहेत काय?, असा संतप्त सवाल शेलार यांनी केला. ज्या पद्धतीने गोविंदांच्या विरोधात बलाचा वापर करून, अटक करून, धरपकड करून, नोटीस देऊन, केसेस टाकताय म्हणून हा सवाल आम्ही तुम्हाला विचारतोय, असंही ते म्हणाले.