Gunratna Sadavarte : जरांगे पाटील भुकायला निघालाय, त्याला हाडकं टाकली अन्… गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल

Gunratna Sadavarte : जरांगे पाटील भुकायला निघालाय, त्याला हाडकं टाकली अन्… गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल

| Updated on: May 21, 2025 | 10:58 AM

छगन भुजबळ यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. यावर भुजबळ यांचे कट्टर विरोधक मनोज जरांगे पाटील यांनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया देताना अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला.

मनोज जरांगे पाटील कोण लागून गेला. आज महाराष्ट्रात आनंदी आनंद आहे. ओबीसी समाजातील, भटक्या विमुक्तांचा आवाज असलेले छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना मंत्री केल्यामुळे लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.  पुढे सदावर्तेंनी असंही म्हटलं की,  छगन भुजबळांना टार्गेट केल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. मात्र पुन्हा भुजबळ मंत्री झाले आहेत. जरांगे हा भुकायला निघाला आहे. जरांगेला कोणी किती हाडकं टाकली ते मला सांगायचे नाही. पण गरळ ओकण्याची मर्यादा असते, असे म्हणत कायद्याची पायमल्ली जरांगेंनी करू नये, असा इशाराच सदावर्ते यांनी दिलाय. तर कायद्यापेक्षा मनोज जरांगे मोठा नाही. मनोज जरांगे पाटील याची पाठराखण कोण करतंय? असा सवाल करत सदावर्तेंनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

Published on: May 21, 2025 10:58 AM