Gunratna Sadavarte Video : सदावर्ते RSS च्या भैय्याजी जोशींसाठी मैदानात, ज्यावरून गदारोळ ‘त्या’च वक्तव्याचं समर्थन, म्हणाले..

Gunratna Sadavarte Video : सदावर्ते RSS च्या भैय्याजी जोशींसाठी मैदानात, ज्यावरून गदारोळ ‘त्या’च वक्तव्याचं समर्थन, म्हणाले..

| Updated on: Mar 06, 2025 | 5:28 PM

'मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. मुंबईच्या अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या परिसरात विविध भाषा बोलल्या जातात. घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे.' भैय्याजी जोशी यांनी एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावरून राज्यात गदारोळ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भैय्याजी जोशींनी मराठी भाषेसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात एकच गदारोळ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय वर्तुळातील काही नेते मंडळी भैय्याजी जोशींनी केलेल्या वक्तव्यावरून भाजपवरच निशाणा साधताय तर आता वकील गुणरत्न सदावर्ते हे देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भैय्याजी जोशींसाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. भैय्याजी जोशींनी केलेल्या विधानाचं समर्थन आणि स्वागत करतो असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. इतकंच नाहीतर भैय्याजी जोशी हे ऋषीतुल्य आहेत. त्यांचा अभ्यास दांडगा असल्याचेही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय. त्यांचा दांडगा अभ्यास असल्याने त्यांच्या मोठ्या चिंतनातून त्यांनी विधान केलं असल्याचे सदावर्ते यांनी यावेळी म्हणत त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहे. कोणतीही भाषा ही अभिजात नसते तर ती व्यक्त होण्याचं एक साधन असल्याचेही सदावर्ते यांनी म्हणत भैय्याजी जोशींच्या वक्तव्याचं समर्थन करत त्यांना पाठिंबा दिल्याचे बघायला मिळत आहे.

असं म्हणाले होते भैय्याजी जोशी 

“मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. मुंबईच्या अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या परिसरात विविध भाषा बोलल्या जातात. घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. तर गिरगावात हिंदी बोलणारे कमी आहेत. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक आढळतील. मुंबईत येणार्‍या व्यक्तीने मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही.” असे वक्तव्य भैय्याजी जोशी यांनी एका कार्यक्रमात केलं होतं.

Published on: Mar 06, 2025 05:28 PM