Vaishnavi Hagawane Case :  हगवणे कुटुंबियांकडून दोन्ही सूनांचा छळ, लग्नात दोघींकडून घेतला मोठा हुंडा; रक्कम ऐकून व्हाल थक्क

Vaishnavi Hagawane Case : हगवणे कुटुंबियांकडून दोन्ही सूनांचा छळ, लग्नात दोघींकडून घेतला मोठा हुंडा; रक्कम ऐकून व्हाल थक्क

| Updated on: May 24, 2025 | 11:29 AM

वैष्णवीप्रमाणेच मोठी सून मयुरी जगताप हगवणे कडूनही लग्नात मोठा हुंडा घेतल्याचे समोर आले आहे. यामध्ये 12 लाख रोख रक्कम, 20 तोळे सोने आणि साखरपुड्याचा सगळा खर्च मयुरी यांच्या कुटुंबियांकडून केला होता.

पुण्यातील वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. मात्र वैष्णवीचा मृत्यू संशयास्पद असल्याने याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला असताना एक-एक धक्कादायक गोष्टी समोर आल्यात. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांकडून सासरच्या मंडळींनी हुंड्यांसाठी आपल्या मुलीचा छळ केल्याचा आरोप हगवणे कुटुंबावर केला. दरम्यान, वैष्णवीच्या वडिलांनी राजेंद्र हगवणे यांच्या मुलाला शशांकला लग्नात हुंडा म्हणून 51 तोळे सोने, 7.5 किलो चांदीची ताटे आणि फॉर्च्युनर कार दिली होती. दरम्यान, या लग्नाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारही उपस्थित असल्याने अजित पवारांना देखील सवाल केले जात असताना त्यांनी काल पत्रकार परिषद घेत य़ा प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. अशातच हगवणेंच्या दोन्ही सुनांचा छळ होत असल्याचे समोर आले आहे. मोठी सून मयुरी जगताप हगवणे आणि मृत्यू झालेल्या वैष्णवीकडून लग्नात हगवणेंनी किती हुंडा घेतला याची माहिती समोर आली आहे.

Published on: May 23, 2025 09:54 AM