Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर, काय झाली चर्चा?

Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर, काय झाली चर्चा?

| Updated on: May 16, 2025 | 2:33 PM

Harshvardhan Sapkal Meets Uddhav Thackeray : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे आज मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. प्रदेशाध्यक्ष बनल्यानंतर ते आज पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची भेट घेत आहेत.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर सपकाळ यांची ही उद्धव ठाकरेंसोबतची पहिलीच भेट आहे. महाविकास आघाडीच्या पुढील वाटचाली संदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

राज्यात सध्या महापालिका निवडणुका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर मविआ वाचवण्यासाठी काँग्रेसने धावाधाव सुरु केली आहे. त्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत. काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आज ते उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर आलेले आहेत.

Published on: May 16, 2025 02:33 PM