मोठा पूर! 33 हजार 408 क्युसेकने विसर्ग सुरू, महाराष्ट्रातील पवित्र नदीचा धडकी भरवणारा Video

मोठा पूर! 33 हजार 408 क्युसेकने विसर्ग सुरू, महाराष्ट्रातील पवित्र नदीचा धडकी भरवणारा Video

| Updated on: Jul 05, 2026 | 12:13 PM

भुसावळ तालुक्यात मुसळधार पावसामुळे हतनूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. प्रशासनाने धरण परिसर आणि तापी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. भुसावळ आणि जळगाव जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील हतनूर धरणाचे तब्बल 16 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले आहेत. सध्या धरणातून 33 हजार 408 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 288 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे आगामी काही तासांत आणखी पाण्याचा विसर्ग वाढवला जाऊ शकतो, अशी शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

पाटबंधारे उपविभागीय अधिकारी एस जी चौधरी यांनी नागरिकांना नदीपात्र आणि धरण परिसरात न जाण्याचे आवाहन केले आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Published on: Jul 05, 2026 12:12 PM
Follow Us