Rajesh Tope | राज्यात 15 ते 18 वयोगटातील 40 टक्के मुलांचं लसीकरण : राजेश टोपे

Rajesh Tope | राज्यात 15 ते 18 वयोगटातील 40 टक्के मुलांचं लसीकरण : राजेश टोपे

| Edited By: | Updated on: Jan 14, 2022 | 7:54 PM

राज्याला काल साडे सहा लाख लसी मिळाल्या असून त्या राज्यात वितरित केल्या जातील परंतु राज्याला 40 लाख लसींनी गरज आहे, मात्र सध्या राज्यात दोन ते तीन दिवस पुरेल एव्हढाच लसीचा स्टोक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

जालना : 15 ते 18 वयोगटातील मुलांचे राज्यात 40 टक्के लसीकरण झाले आहे. अशीच गती राहिली तर 15 दिवसात हे लसीकरणा संपायला पाहिजे होते. काळजी घेऊन लसीकरण केले असते तर हे लसीकरण झाले असते. शाळा आणि कॉलेज मध्ये सुट्या द्यायच्या अगोदर दक्षता घेऊन काळजी घेतली असती तर लसीकरण झाले असते. आता या विद्यार्थ्यांना घरून घेऊन लसीकरण करणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. राज्याला काल साडे सहा लाख लसी मिळाल्या असून त्या राज्यात वितरित केल्या जातील परंतु राज्याला 40 लाख लसींनी गरज आहे, मात्र सध्या राज्यात दोन ते तीन दिवस पुरेल एव्हढाच लसीचा स्टोक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.