गडचिरोलीत 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस
गेल्या तीन दिवसांपासून विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत जोरदार पाऊस कोसळत आहे. नद्यांना पूर आला आहे. विदर्भातील गोसेखुर्द आणि बेंबळा प्रकल्पाची दारं उघडण्यात आली असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
गेल्या तीन दिवसांपासून विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत जोरदार पाऊस कोसळत आहे. नद्यांना पूर आला आहे. विदर्भातील गोसेखुर्द आणि बेंबळा प्रकल्पाची दारं उघडण्यात आली असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. विदर्भात पावसामुळे 14 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यात वर्धा जिल्ह्यातील सहा, गडचिरोलीतील चार, अमरावतीतील दोन आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात शनिवारी एक ट्रक पेरमिली नाल्यावरून वाहून गेला. ट्रकमधील तिघांचे मृतदेह सापडले आहेत.
Published on: Jul 12, 2022 02:11 PM
