पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, 8 गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला

पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, 8 गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला

| Edited By: | Updated on: Jul 12, 2022 | 2:05 PM

मुंबई, ठाण्यासह पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जव्हार-मोखाड्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर वावर वांगणी इथल्या वाघ नदीला मोठा पूर आला आहे. इथल्या आठ गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे.

मुंबई, ठाण्यासह पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जव्हार-मोखाड्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर वावर वांगणी इथल्या वाघ नदीला मोठा पूर आला आहे. इथल्या आठ गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. येत्या 48 तासांत मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकणात आणि विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून राज्यात अनेक ठिकाणी बचाव पथक सज्ज ठेवण्यात आली आहेत. हवामान खात्याने राज्यात मंगळवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यंदा जुलैच्या सुरुवातीपासून राज्यभरात पावसाने जोर धरा असून त्यामुळे 10 जुलैपर्यंत सरासरी 336 मिमी म्हणजेच सरासरीच्या 107 टक्के पाऊस पडला आहे.