Satara जिल्हा रुग्णालयाजवळ आढळली मानवी कवटी, गृहराज्यमंत्री Shambhuraj Desai यांचे चौकशीचे आदेश
सातारा पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी या सापडलेल्या कवटीच्या ठिकाणाचा पंचनामा करून ही मानवी कवटी ताब्यात घेतली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात ही कवटी आलीच कुठून आणि नेमकी ही कवटी कोणाची आहे याचा शोध सातारा पोलिसांनी सुरू केला आहे.
सातारा : जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात मानवी कवटी दिसल्याचं गेल्या दोन-तीन दिवसापासून सांगितलं जात होतं. मात्र ती कवटी अचानक गायब झाली आणि आज जिल्हा रुग्णालयाच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर ही कवटी पुन्हा आढळून आली आहे. या नंतर सातारा पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी या सापडलेल्या कवटीच्या ठिकाणाचा पंचनामा करून ही मानवी कवटी ताब्यात घेतली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात ही कवटी आलीच कुठून आणि नेमकी ही कवटी कोणाची आहे याचा शोध सातारा पोलिसांनी सुरू केला आहे.
