Husain Dalwai : काटेगल्लीतील हिंसाचार प्रकरण; हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात

Husain Dalwai : काटेगल्लीतील हिंसाचार प्रकरण; हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात

| Updated on: Apr 22, 2025 | 4:40 PM

Nashik Crime News : काटेगल्लीतील हिंसाचार प्रकरणी आज नाशिक पोलिसांनी हुसैन दलवाई यांना ताब्यात घेतले आहे.

नाशिक पोलिसांनी हुसैन दलवाई यांना ताब्यात घेतले आहे. नाशिक येथील काठे गल्लीतील अनधिकृत सातपीर दर्याच्या पाडकामावेळी दगडफेक झाली होती. यात अनेक पोलिस जखमी झाले होते. त्यानंतर येथे तणावपूर्ण शांततेत अतिक्रमण कारवाई करण्यात आली. आज काँग्रेसचे माजी खासदार हुसैन दलवाई नाशिकमध्ये दाखल झाले. दर्गावर केलेल्या अतिक्रमण कारवाईची पाहणी करण्यासाठी ते जात असतानाच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हुसैन दलवाई यांना गंगापूर पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. यावेळी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना दलवाई यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. मी दंगा करणारा माणूस नाही, जे दंगे करतात त्यांना तुम्ही संरक्षण देतात, असे दलवाई यांनी यावेळी बोलताना म्हंटले आहे.

Published on: Apr 22, 2025 04:40 PM