Bandatatya Karadkar | मी कुठेही गायब झालोलो नाही, बंडातात्या कराडकरांनी जारी केला व्हिडीओ

Bandatatya Karadkar | मी कुठेही गायब झालोलो नाही, बंडातात्या कराडकरांनी जारी केला व्हिडीओ

| Edited By: | Updated on: Jul 01, 2021 | 12:49 PM

सर्व वारकऱ्यांनी आळंदी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या या आवाहनानंतर फलटण पोलीस पिंप्रदच्या गुरुकुल आश्रमात दाखल झाले होते.

सर्व वारकऱ्यांनी आळंदी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या या आवाहनानंतर फलटण पोलीस पिंप्रदच्या गुरुकुल आश्रमात दाखल झाले आहेत. मात्र, सध्या कराडकर या आश्रमात उपस्थित नसल्याची माहिती मिळते आहे. मात्र, आता त्यांनी एक व्हिडीओ जरी करून, मी कुठेही गायब झालोलो नाही, असे म्हटले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच संभाव्य तिसरी कोरोना लाट लक्षात घेता यंदा आषाढी वारीवर अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्य सरकारने तसा निर्णय घेतला आहे. मात्र, बंडातात्या कराडकर यांनी राज्यातील वारकऱ्यांना येत्या 3 जुलै रोजी आळंदी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.