Banda Tatya Karadkar यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल करणार – Rupali Patil

| Updated on: Feb 04, 2022 | 3:10 PM

महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल करणार असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी सांगितले.

Follow us on

बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांना महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणं चांगलंच भोवलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. विशेष म्हणजे त्यांनी जाहीरपणे दिलगीरी व्यक्त केलेली असली तरी या प्रकरणावर पडदा पडताना दिसत नाहीये. महिला आयोगाने (Women’s Commission) त्यांच्याकडे खुलासा मागवला आहे. तसेच बंडातात्या कराडकर यांच्यासह 125 वारकऱ्यांवर सातारा (Satara Police) शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. विनापरवाना जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी कलम 269, 270, 188, 37(1)(3) 135 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडातात्या कराडकर यांनी राज्य शासनाच्या वाईन विक्री निर्णयाच्या विरोधात दंडुका-दंडवत मोर्चा काढला होता. दरम्यान, बंडातात्या करडाकर यांचे महिलांविषयीचे असे बोलणे कदापि खपवून घेतले जाणार नाही, अशी भूमिका राज्यातील महिला नेत्यांनी घेतली आहे. दरम्यान, महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल करणार असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी सांगितले.