Kirit Somaiya : पुरावे खोटे तर मग घाबरता कशाला? संजय राऊतांना सोमय्यांचा सवाल
आज संजय राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. यावर भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आज संजय राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. यादरम्यान काही ट्विट करत संजय राऊत यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. पुरावे खोटे आहेत, कारवाईही खोटी आहे मी शिवसेनेसाठी लढत राहील असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुरावे खोटे आहेत तर घाबरता कशाला? असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.
