Montha Cyclone : महाराष्ट्राची चिंता कायम, पुढील दोन दिवस…’मोन्था’मुळे कोकण किनारपट्टीला धोका, काय दिला अलर्ट?
मोन्था चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे समुद्र खवळला असून, रत्नागिरी जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पाऊस सुरू आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मोन्था चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीला यलो अलर्ट देण्यात आला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सध्या प्रशासन अलर्ट मोडवर आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे समुद्र खवळलेला पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी दुपारनंतर पावसाची बरसात झाली आहे. हवामान विभागाने मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह जिल्ह्यात अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
किनारपट्टी भागात ताशी 40 ते 45 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे मच्छिमारांना खोल समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचे आवाहन केले आहे. सकाळपासून किनारपट्टी भागात ढगाळ हवामान होते, तर काल रात्रीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या.
पुढील दोन दिवस कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहणार आहे. मोन्था चक्रीवादळाचा थेट परिणाम जाणवला नसला तरी, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे.
