International Monetary Fund : कर्ज हवंय? 11 अटी पूर्ण करा; अंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला सूचना

International Monetary Fund : कर्ज हवंय? 11 अटी पूर्ण करा; अंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला सूचना

| Updated on: May 18, 2025 | 4:37 PM

Pakistan loan conditions : आयएमएफकडून कर्ज हवं असल्यास पाकिस्तानला अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. अंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून या अटी घालण्यात आलेल्या आहेत.

अंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला आणखी 11 नवीन अटी घालण्यात आलेल्या आहेत. भारतासोबतच्या वादानंतर पाकिस्तानवर आता या वाढीव अटी असणार आहेत. आयएमएफकडून कर्ज हवं असल्यास पाकिस्तानला 50 अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. पाकिस्तानला कर्ज हवं असल्यास या अटींची पूर्तता बंधनकारक असणार आहे.

यात पाकिस्तानला बजेटमध्ये वीज महाग करण्याच्या सूचना अंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून देण्यात आलेल्या आहेत. 3 वर्षांपासून अधिक वापरलेल्या गाड्यांच्या आयातीवर अटी लावून आयात कमी करा. शेतकऱ्यांवर इन्कम टॅक्स लावण्याच्या देखील सूचना अंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला देण्यात आलेल्या आहेत. सरकारचा पुढील वर्षाचा कारभार कसा चालणार याचा अहवाल काढण्याच्या देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसंच गॅस वापरावर कर वाढवण्याची देखील सूचना दिलेली आहे.

Published on: May 18, 2025 04:37 PM