Sambhajinagar : वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध, आमखास मैदानावर काम थांबवले

Sambhajinagar : वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध, आमखास मैदानावर काम थांबवले

| Updated on: Apr 30, 2025 | 4:26 PM

Wakf Board office controversy : छत्रपती संभाजीनगरमध्ये होत असलेल्या वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या कामाला माजी खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये आमखास मैदानावर वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या कामाला सुरुवात झाली आहे. वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या कामाला एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केलेला आहे. आमखास मैदानावर जेसीबी आणि इतर बांधकाम वाहनांच्या सहाय्याने सुरू करण्यात आलेलं होतं. याठिकाणी खड्डा देखील खोदण्यात आलेला होता. मात्र माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या कामाच्या ठिकाणी येऊन कमाल विरोध दर्शवत हे काम बंद पडलं आहे. आमखास हे संभाजीनगरमधील सर्वात मोठे मैदान असून या ठिकाणी वक्फ बोर्डाच्या कार्यालयाची उभारणी करण्यात येणार होती. मात्र आता जलील यांच्याकडून बांधकामासाठी खोदण्यात आलेला खड्डा बुजवण्यास सांगितला जात आहे. हे काम होऊ देणार नाही, अशा प्रकारची भूमिका इम्तियाज जलील यांच्याकडून घेण्यात आलेली आहे.

Published on: Apr 30, 2025 04:26 PM