गणेशोत्सवाच्या देखाव्यावत अवतरली शिवराय-तुकोबांची भेट

| Updated on: Sep 05, 2022 | 1:21 PM

गणेश चतुर्थीनिमित्त राज्यातील विविध भागात वेगवेगळ्या कार्यक्रमांसह अनेक देखाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील गणेश उत्सवातील देखावे चर्चेचा विषय ठरत आहेत. त्याचप्रमाणे नाशिकमध्येही कुंडगर परिवाराने शिवराय आणि संत तुकाराम यांच्या भेटीचा हा देखावा साकारला आहे.

Follow us on

गणेश चतुर्थीनिमित्त राज्यातील विविध भागात वेगवेगळ्या कार्यक्रमांसह अनेक देखाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील गणेश उत्सवातील देखावे चर्चेचा विषय ठरत आहेत. त्याचप्रमाणे नाशिकमध्येही कुंडगर परिवाराने शिवराय आणि संत तुकाराम यांच्या भेटीचा हा देखावा साकारला आहे. हा देखावा पाहण्यासाठी जोरदार गर्दी होत असून शिवराय-तुकोबाराय भेटीची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. नाशिकातील कुंडगर कुटुंबीयांकडून हा ऐतिहासिक देखावा साकारण्यात आला असून इगतपुरीतील या भक्ती शक्तीच्या ऐतिहासिक देखाव्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. शिवराय आणि संत तुकाराम महाराजांच्या भेटीचा सुंदर देखावा लोकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आल्या असून गणेशोत्सवाच्या देखाव्यातील जिवंतपणामुळे हा देखाव सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.