Special Report | थोरल्या पवारांच्या हजेरीत पवार बंधूंमध्ये टोलेबाजी

Special Report | थोरल्या पवारांच्या हजेरीत पवार बंधूंमध्ये टोलेबाजी

| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 10:14 PM

काम थोड गोड बोलुन, गोंजरून, एखादा चिमटा काढत, पण सारखं सारखं सगळीकडून चिमटं काढून कसं जमंल, या शब्दात उपमुख्यमंत्री अजितदांदानी (Ajit Pawar) बंधू राजेंद्र पवार(Rajendra  Pawar)  यांच्या भाषणावर केली टिपण्णी केली. 

बारामती- ”आज आमच्या बंधूंच भाषण ऐकत होतो. गाडी एकदम सुसाट होती की काय समजायलाच मार्ग नाही. समोर आम्ही सगळे होतो, पण बाबा थांबायला तयारच नाही. आपल्याला कुणाकडून काम करून घ्यायची असतील तर त्याच उभं -आडवं करून कसं काम होणार’. काम थोड गोड बोलुन, गोंजरून, एखादा चिमटा काढत, पण सारखं सारखं सगळीकडून चिमटं काढून कसं जमंल, या शब्दात उपमुख्यमंत्री अजितदांदानी (Ajit Pawar) बंधू राजेंद्र पवार(Rajendra  Pawar)  यांच्या भाषणावर केली टिपण्णी केली. इन्क्युबेशन व इनोव्हेशन आणि विज्ञान संशोधन केंद्राच्या उदघाटन ( Incubation & Innovation Center) कार्यक्रमात, ते बोलत होते. ‘पण जाऊ दे आत दिवाळीचा सण आहे, मोठे बंधू पडतात. पण जी काही नोंद घ्यायची ती आम्ही घेतली, बंधूराज हे एवढंच सांगतो. अन् जेवढं काही करता येईल त्यासाठी मुख्यमंत्री नेहमीच सकारात्मक असतात, असही ते म्हणाले.