India-Pakistan : भारताचा पाकड्यांना आणखी मोठा दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक मोठे आणि कठोर निर्णय घेतले, ज्यात सिंधू पाणी कराराला स्थगिती देण्यात आली आहे. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. त्यानंतर भारताने आणखी एक दणका दिला
भारताने पाकड्यांना आणखी एक मोठा दणका दिल्याचे पाहायला मिळाले आहे. भारताने पाकिस्तानसाठी येत्या २३ मे पर्यंत हवाई क्षेत्र बंद केले आहे. त्यामुळे त्यांच्या विमान कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. भारताकडून पाकिस्तानच्या विमानांसाठी हवाईक्षेत्र बंद करण्याची नोटीस जारी करण्यात आली. पाकिस्तानच्या रजिस्टर खासगी भाड्यावर घेतलेल्या विमान कंपन्यांना ही बंदी घालण्यात आली आहे. इतकंच नाहीतर पाक लष्करी विमानांना ही भारतीय हवाई क्षेत्रात बंदी असणार आहे. तर येत्या २३ मे पर्यंत भारताचं हवाईक्षेत्र पाकिस्तानच्या विमानांसाठी बंद असणार आहे. दरम्यान, भारताने पाकड्यांचे हवाईक्षेत्र बंद केल्याचा फटका पाकिस्तानच्या विमान कंपन्यांना बसत असल्याचे पाहायला मिळतंय. पाक विमानांना भारतीय हवाईक्षेत्राऐवजी लांबचा मार्ग अवलंबावा लागणार आहे.
Published on: May 01, 2025 04:50 PM
