Corona Virus Update : देशात 1 हजारांवर रुग्ण, 10 मृत्यू; महाराष्ट्र आणि केरळ कोरोनाचे नवे हॉटस्पॉट
Maharashtra Corona Virus Update : देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाने केलेलं आहे.
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आत्तापर्यंत 11 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 45 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक 787 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रानंतर केरळ आणि गुजरातमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आली आहे.
कोरोनाने देशात पुन्हा एकदातोंड वर काढायला सुरूवात केली आहे. देशात कोरोनाने झालेल्या मृत्यूमध्ये सर्वाधिक 5 मृत्यू हे महाराष्ट्रातले आहे. सोमावरी ठाण्यात कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत ठाण्यात दोघांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या पुणे, मुंबई आणि ठाण्यात आहे. देशासह राज्यात वाढती कोरोना रुग्णांची संख्या बघता नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि काळजी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
