Pahalgam Terror Attack Update : पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली

Pahalgam Terror Attack Update : पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली

| Updated on: Apr 25, 2025 | 4:27 PM

India Pakistan border tension : पाकिस्तानला आता आंतरराष्ट्रीय सीमेवरून देखील धोका असल्याने तयाठिकाणी देखील पाकच्या सैन्याकडून बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात कठोर निर्णय घेतले आहेत. त्यावर पाकिस्तानकडून देखील भारतावर निर्बंध लादण्याचा फोल प्रयत्न केले गेले आहेत. सध्या दोन्ही देशांत तणावाची परिस्थिति बघायला मिळत असतानाच सीमेवर देखील दोन्ही देशांकडून सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आलेली दिसत आहेत. पाकिस्तानने एलओसी जवळ सैन्याची संख्या वाढवलेली आहे. तसंच पाकिस्तानी सैनिकांना बंकरच्या आतूनच पळत ठेवण्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत. कारण पाकिस्तानला आता आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील भिती आहे. सियालकोट मधील तैनात डिव्हिजनलासुद्धा सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले असल्याची माहिती समोर आली आहे.

Published on: Apr 25, 2025 04:24 PM