India Air Strike on Pakistan : भारतावर हल्ल्याची खुमखुमी भोवली, पाकची जिरवली…चायना मेड विमानांचा चुराडा
पाकिस्तानकडून भारताच्या ३ राज्यात हल्ला करण्यात आले आहे. भारताकडून पाकिस्तानचे ७ शहरं टार्गेट करण्यात आले. प्रत्युत्तरात पाकिस्तानवर मोठा मिसाईल हल्ला करण्यात आला. यावेळी भारताकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं.
पाकिस्तानने भारताच्या सात शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्याने पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. पाकिस्तानकडून नागरी वस्त्यांना लक्ष्य करण्यात आलं असून पुंछ सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार कऱण्यात आला. भारताकडून पाकिस्तानला देण्यात आलेल्या करारा जवाबाच्या माध्यमातून भारतीय सैन्याने आतापर्यंत पाकची पाच विमानं खाक केले आहे. यामध्ये पाकिस्तानची दोन एफ-१६ विमानं आणि दोन जे-११ फायटर प्लेन नष्ट करण्यात भारताला यश आलं आहे. पाकिस्तानच्या चायना मेड जे-११ विमानाचा भारताकडून चुराडा करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे. जल-थल आकाशातून भारताने पाकिस्तानवर पलटवार केला आहे. या प्रत्युत्तरात जे-११, जे-१७, एफ- १६, एफ- १७, जेएफ-११, एफ-१६, जेएफ-१७, जेएफ ११, एफ १६ हे विमान अमेरिकेकडून पाकिस्तानला देण्यात आलं होतं. मात्र याचा फक्त दहशतवादाविरोधात वापक केला जावा, असं अमेरिकेने करारामध्ये म्हटलं होतं. हा करार मोडत पाकिस्तानने भारतावर या विमानाचा वापर करत प्रत्युत्तर दिलंय.
