India-Pakistan War : पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीकडून पाकिस्तानवर हल्ला

India-Pakistan War : पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीकडून पाकिस्तानवर हल्ला

| Updated on: May 09, 2025 | 10:40 AM

Baluchistan Attack On Pakistan : एकीकडे सीमेवर भारताकडून पाकिस्तान तोंडघाशी पडत असतानाच दुसरीकडे बलुचिस्तान कडून देखील आता पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केला जात आहे.

बलुचिस्तानच्या अनेक भागात बलुचिस्तानी आर्मीने पाकिस्तानी सैनिकांवर गोळीबार केला आहे. त्यामुळे पाकिस्तानवर घरीदारी हल्ला होत आहे. बलुचिस्तानकडून आता बंडखोरी करण्यात आलेली आहे. त्यांनी देखील आता पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं आहे. पाकिस्तानला गॅस पुरवठा करणारी एक प्रमुख पाईपलाइन देखील बलुचिस्तानकडून फोडण्यात आलेली आहे. पाकच्या दारात आणि घरात देखील युद्ध सुरू झालेलं आहे. बलुच बंडखोर गटाकडून मोठे हल्ले पाकिस्तानवर केले जात आहे.

बलुचिस्तान भागाच्या अनेक अनेक पोलीस चौक्यांवर ताबा मिळवला असल्याचा दावा बलुच आर्मीने केलेला आहे. हा ताबा मिळवल्यानंतर या पोलीस चौक्यांवर बलुच आर्मीने स्वतंत्र झेंडा फडकवला आहे. पाकिस्तान वायुसेनेच्या 2 अधिकाऱ्यांची बलुच आर्मीने हत्या केली असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

Published on: May 09, 2025 10:40 AM