India Pakistan War : नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; वयोमिका सिंग यांनी पाकिस्तानचं पितळ उघडं पाडलं

India Pakistan War : नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; वयोमिका सिंग यांनी पाकिस्तानचं पितळ उघडं पाडलं

| Updated on: May 09, 2025 | 7:15 PM

Wing Comander Vyomika Sing : भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आज पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानकडून काल झालेल्या हल्ल्याची माहिती दिली असून पाकच्या कुरापती उघड्या पडल्या आहेत.

कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंह आणि परराष्ट्र खात्याचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काल रात्री पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्याची माहिती दिली आहे. यावेळी माहिती देताना विंग कमांडर वयोमिका सिंग यांनी सांगितलं की, पाकिस्तान साडे आठ वाजता ड्रोन आणि मिसाईल हल्ला केल्यानंतर नागरी हवाई क्षेत्र बंद केलं नाही. नागरी विमानांना ते ढाल म्हणून वापर करत आहेत. पाकिस्तानने भारताची वायू हद्द ओलांडली. त्यावेळी भारताकडून चार ड्रोनच्या माध्यमातून प्रतिहल्ला करण्यात आला. पाकिस्तानमध्ये चार हवाई रक्षण यंत्रणांवर हल्ले करण्यात आले, त्यात एक यंत्रणा उद्धवस्त करण्यात आली असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

Published on: May 09, 2025 07:15 PM