India Vs Bangladesh : बांग्लादेशाला धक्का! बांग्लादेशातून आयात होणाऱ्या वस्तूंवर निर्बंध
India bans imports from Bangladesh : ऑपरेशन सिंदूरनंतर बांग्लादेशने घेतलेल्या भूमिकेमुळे भारताने आता बांग्लादेशातून आयात होणाऱ्या वस्तूंवर निर्बंध लादलेले आहेत.
बांग्लादेश मधून आयात होणाऱ्या मालावर भारताकडून निर्बंध लावण्यात आलेले आहेत. मासे, तेल आणि दगडांची वाहतूक करणाऱ्या ट्रकनाच वाहतूक परवानगी देण्यात आलेली आहे. निर्बंध लावल्यानंतर भारत – बांग्लादेशच्या सीमेवर रांगा लागल्या आहेत. यामुळे बांग्लादेशला 66 हजार कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे. बांग्लादेशने ऑपरेशन सिंदूर नंतर घेतलेल्या भूमिकेमुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
निर्बंध घातलेल्या वस्तूंमध्ये रेडीमेड कपड्यांव्यतिरिक्त प्लास्टिक आणि पीव्हीसी उत्पादनं, लाकडी फर्निचर, फळांची आणि कार्बोनेटेड पेये, बेकरी, कापसाशी संबंधित टाकाऊ वस्तू आणि मिठाई उत्पादनं यांचा समावेश आहे. हे सर्व आता मेघालय, आसाम, त्रिपुरा, मिझोरम आणि पश्चिम बंगालमधील अकरा नियुक्त सीमा चौक्यांमधून भारतात प्रवेश करू शकणार नाहीत.
Published on: May 19, 2025 06:24 PM
