India Pakistan Conflict : पाकिस्तानला पाण्याचा थेंबासाठी तरसवण्याची तयारी सुरू

India Pakistan Conflict : पाकिस्तानला पाण्याचा थेंबासाठी तरसवण्याची तयारी सुरू

| Updated on: May 05, 2025 | 3:52 PM

India Stops Chenab River Water : पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधु जल करार स्थगित केला आहे. त्यानंतर आता चिनाब नदीचं पाणी देखील रोखण्यात आलेलं आहे.

भारताने पाकिस्तानच्या विरोधात आणखी एक मोठी कारवाई केली आहे. सिंधु जल करार स्थगित केल्यानंतर आता भारताने आता पाकिस्तानला जाणारं चिनाब नदीचं पाणी रोखलं आहे. इतकंच नाही तर भारत आता काश्मीरच्या किशनगंगा धरणातलं पाकिस्तानला जाणारं झेलम नदीचं पाणी देखील रोखण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. टीव्ही9 च्या प्रतिनिधीने चिनाब नदीच्या पत्रात जाऊन या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. याच नदीतून पाणी पाकिस्तानच्या सियालकोट भागात जात होतं. मात्र आता हे पाणी थांबवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचे पाण्यावाचून हाल होणार आहेत.

Published on: May 05, 2025 03:52 PM