IPL 2025 BIG Update : भारत-पाक तणावामुळे आयपीएल स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?

IPL 2025 BIG Update : भारत-पाक तणावामुळे आयपीएल स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?

| Updated on: May 09, 2025 | 4:06 PM

आयपीएलच्या 18 व्या सीझनमधील उर्वरित सामने हे आठवड्याभरासाठी स्थगित करण्यात आले आहेत. त्यामुळे उर्वरित सामने कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता या उर्वरित सामन्यांच्या वेळापत्रकाबाबत मोठी अपडेट समोर आलीये

आयपीएल क्रिकेट सामन्यांबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. आयपीएलचे उर्वरित सामने एका आठवड्यासाठी स्थगित कऱण्यात आले आहेत. तर एका आठवड्यानंतर आयपीएलच्या उर्वरित सामन्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे BCCI कडून सांगितले जात आहे. दरम्यान, आयपीएल क्रिकेट सामन्यातील आणखी १६ सामने शिल्लक आहेत. मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे उरलेले सामने एका आठवड्यासाठी स्थगित कऱण्यात आले आहेत. तर एका आठवड्यानंतर उर्वरित सामन्यांसंदर्भात आयपीएलचं वेळापत्रक जाहीर होणार आहे. तर पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यांमुळे गुरुवारी जम्मू, पंजाब आणि राजस्थानमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. धर्मशाला येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणारा ५८ वा सामना १०.१ ओव्हर नंतर थांबवण्यात आला आणि रद्द करण्यात आला होता आणि खेळाडूंना दिल्लीत आणण्यात आलं होतं.  आयपीएलमध्ये एकूण ७४ सामने खेळण्यात येणार आहेत. 22 मार्चपासून सुरु झालेल्या आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना २५ मे रोजी कोलकत्ता येथील  ईडन गार्डन्स मैदानावर खेळण्यात येणार होता. मात्र आता या सर्व स्पर्धेवर टांगती तलवार असून सध्या तरी हे सामने स्थगित करण्यात आलेत.

Published on: May 09, 2025 04:06 PM