Jain Boarding Land Row:  पालकमंत्री फिरकलेच नाही, आता निवडणुका जवळच…, गुप्तीनंद महाराजांचा थेट अजितदादांना इशारा

Jain Boarding Land Row: पालकमंत्री फिरकलेच नाही, आता निवडणुका जवळच…, गुप्तीनंद महाराजांचा थेट अजितदादांना इशारा

| Updated on: Oct 26, 2025 | 2:28 PM

पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी आचार्य गुप्तीनंद महाराजांनी पालकमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. जमीन गैरव्यवहाराची दखल न घेतल्यास निवडणुका जवळच आहेत असा इशारा त्यांनी दिला. या मागणीचा विचार न झाल्यास नाशिकमध्ये उद्या जैन समाजाचा मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे.

पुण्यातील जैन बोर्डिंग जमिनीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणावरून आचार्य गुप्तीनंद महाराज यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी महाराजांनी केली असून, त्यांनी “निवडणुका जवळच आहेत” असा अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

महाराजांच्या म्हणण्यानुसार, पालकमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष दिले नाही. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना आवाहन केले होते आणि त्यांच्या कारवाईमुळेच आठ दिवसांची तात्पुरती स्थगिती मिळाली असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जैन धर्मातील दान केलेल्या वस्तू विकण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे महाराजांनी स्पष्ट केले. हा सौदा बेकायदेशीर असल्याने तो रद्द व्हायला हवा अशी त्यांची मागणी आहे. नाशिकमध्ये उद्या जैन समाजाकडून या प्रकरणी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा अशोक स्तंभापासून सुरू होऊन कलेक्टर कार्यालयापर्यंत जाईल आणि तेथे निवेदन देण्यात येणार आहे. विरोधी पक्षांनीही या मोर्चाला पाठिंबा दर्शवला आहे.

Published on: Oct 26, 2025 02:28 PM