Devendra Fadnavis : फडणवीस मंचावर पण खडसेंना स्थान नाही? मुख्यमंत्र्यांनी नाव घेणंही टाळलं; जळगावात नेमकं काय घडलं?

Devendra Fadnavis : फडणवीस मंचावर पण खडसेंना स्थान नाही? मुख्यमंत्र्यांनी नाव घेणंही टाळलं; जळगावात नेमकं काय घडलं?

| Updated on: Jun 20, 2025 | 2:08 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज शुक्रवारी जळगाव दौऱ्यावर आहेत. क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक, हिंदू गोर बंजारा आणि लबाना समाज कुंभ प्रेरणा स्थळाच्या उद्घाटनासाठी फडणवीस जळगावात दाखल झाले होते. या कार्यक्रमासाठी एकनाथ खडसे दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.

जळगावामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विविध कार्यक्रमांच्या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची हजेरी पाहायला मिळाली. त्यामुळे फडणवीसांच्या कार्यक्रमाला एकनाथ खडसे उपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, जळगावातील धरणगाव येथील फडणवीसांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह भाजपचे बडे नेते गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, गुलाबराव पाटील हे मंचावर होते यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. गुलाबराव पाटील यांच्यानतर गिरीश महाजन यांचा सत्कार करण्यात आला. गिरीश महाजनांनंतर रक्षा खडसे यांचा सत्कार झाला. दरम्यान, फडणवीसांच्या या कार्यक्रमाला एकनाथ खडसे यांची उपस्थिती दिसली. मात्र एकनाथ खडसे मंचावर न दिसता स्टेजखाली बसल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांचं नाव घेणं टाळल्याचेही दिसून आले.

Published on: Jun 20, 2025 02:08 PM