जालिंदर सुपेकरांमुळेच वादग्रस्त मेहुण्याचं झालं प्रमोशन? गुन्हे दाखल असताना बढती कशी?
शशिकांत चव्हाण यांच्यावर यापूर्वी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासह त्यांच्यावर अॅस्ट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल आहे. दरम्यान, असे गुन्हे दाखल असताना शशिकांत चव्हाण यांना प्रमोशन कसं मिळालं? याची चर्चा सध्या सुरू आहे.
जालिंदर सुपेकर यांच्यामुळेच वादग्रस्त मेहुण्याचं प्रमोशन झालं का? अशी चर्चा सध्या सुरू आहे. जालिंदर सुपेकर यांचे मेहुणे शशिकांत चव्हाण हे वादग्रस्त पोलीस अधिकारी असून शशिकांत चव्हाण हे खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. विशेष महानिरीक्षक जालिंदर सुपेकर हे हगवणे कुटुंबाचे नातेवाईक आहेत आणि त्यांचेच मेहुणे हे शशिकांत चव्हाण आहेत.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी फरार होण्यासाठी थार गाडीचा उपयोग केला ती थार गाडी संकेत चोंधे याची होती. संकेत चोंधेच्या भावाच्या पत्नीने छळवणूक होत असल्याबाबत खडक पोलीसात तक्रार दिली होती. यावर कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप धनश्री चोंधे तक्रारदार यांनी केला आहे. जालिंदर सुपेकर यांचे मेहुणे शशिकांत चव्हाण यांच्यावर यापूर्वी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी – नारायणगाव, हाणमारी आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी – खेड मंचर येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. हे गुन्हे दाखल असून देखील त्यांचं प्रमोशन कसं काय झालं??? यामागे जालिंदर सुपेकर आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
