Jalna Flood | पुलावरुन जाताना बस नदीत कोसळली, परतूर आष्टी रोडवरील श्रीष्टी येथील घटना

| Updated on: Sep 23, 2021 | 11:00 PM

रात्रीच्या अंधारात पुलावर पाणी साचले होते. या पाण्याचा अंदाज न आल्याने 23 प्रवाशांनी भरलेली बस थेट कसुरा नदीत कोसळली. पण स्थानिक गावकरी आणि प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. स्थानिक नागरीक आणि पोलिसांनी बसमधील सर्व प्रवाशांना सुखरुप वेळेत बाहेर काढले. त्यामुळे 23 प्रवाशांचा जीव वाचला.

Follow us on

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक नद्या दुथळी भरुन वाहत आहेत. दरम्यान, जालना जिल्ह्यात गुरुवारी (23 सप्टेंबर) रात्री एक भयानक घटना घडली. रात्रीच्या अंधारात पुलावर पाणी साचले होते. या पाण्याचा अंदाज न आल्याने 23 प्रवाशांनी भरलेली बस थेट कसुरा नदीत कोसळली. पण स्थानिक गावकरी आणि प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. स्थानिक नागरीक आणि पोलिसांनी बसमधील सर्व प्रवाशांना सुखरुप वेळेत बाहेर काढले. त्यामुळे 23 प्रवाशांचा जीव वाचला.

संबंधित घटना ही परतूर आष्टी रोडवर श्रीष्टी परिसरात घडली. पुलावरुन बस जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने बस थेट कसुरा नदीत कोसळली. विशेष म्हणजे याच नदीत दुपारी एक तरुण वाहून गेला होता. पण सुदैवाने त्याला पोहता येत असल्याने त्याचे प्राण वाचले होते. त्यानंतर रात्री याच पुलावरुन प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली. या दुर्घटनेत सर्व प्रवाशांचे प्राण वाचवण्यात प्रशासनाला यश आल्याची माहिती एपीआय शिवाजी नागवे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना दिली.