Jalna Rain Updates : जालन्यात वादळी वारा अन् पाऊस; लग्नाचा मंडप उडाला, वऱ्हाडाचे हाल

Jalna Rain Updates : जालन्यात वादळी वारा अन् पाऊस; लग्नाचा मंडप उडाला, वऱ्हाडाचे हाल

| Updated on: May 20, 2025 | 6:58 PM

Jalna weather news : मराठवाड्यात अवकाळी पावसाचा कहर कायम आहे. आज जालना जिल्ह्यात अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने नागरिकांची चांगलीच फसगत केली.

जालन्याच्या बदनापुर तालुक्यातील मांडवा गावात वादळीवाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला आहे. लग्नाचा मंडप उडल्याने वऱ्हाडी मंडळींची चांगलीच तारांबळ उडाली. तसंच तुपेवाडी गावात धार्मिक कार्यक्रमाचा देखील मंडप वादळीवाऱ्याने उडून गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

राज्यभरात वादळी वाऱ्यासह तुफान पावसाने हजेरी लावली असून जालना जिल्ह्यातही अवकाळी पावसाने कहर केलाय. सलग पाचव्या दिवशी जालन्यात तुफान पाऊस सुरू असून वादळी वारा देखील बघायला मिळाला आहे. त्यामुळे आज लग्नाला आलेल्या वऱ्हाडी मंडळींची चांगलीच फजिती झालेली बघायला मिळाली आहे. मांडवा गावात एक लग्न सोहळा सुरू असताना यचणक वादळी वारा आणि पाऊस सुरू झाला. यामुळे लग्नाचा मंडप उडून गेला. अचानक मंडप उडल्याने वऱ्हाडी मंडळींची चांगलीच फजिती झाली. तर तुपेवाडी येथे देखील एका धार्मिक कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला मांडव अशाच प्रकारे उडून गेल्याचं चित्र समोर आलं आहे.

Published on: May 20, 2025 06:58 PM