Pahalgam BIG Update : जंगलातून 22 तास चालले, लोकांचे मोबाईलही हिसकावले, ‘त्या’ दहशतवाद्यांची अखेर ओळख पटली!

Pahalgam BIG Update : जंगलातून 22 तास चालले, लोकांचे मोबाईलही हिसकावले, ‘त्या’ दहशतवाद्यांची अखेर ओळख पटली!

| Updated on: Apr 28, 2025 | 2:31 PM

जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे गेल्या मंगळवारी पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हलला केला. या हल्लेखोरांची ओळख पटली असल्याची माहिती समोर आली आहे.

जम्मू काश्मीर येथील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकूण चार अतिरेक्यांनी हल्ला केला. यामध्ये चार पैकी तीन अतिरेकी हे पाकिस्तानी असून एक अतिरेकी हा स्थानिक असून पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या स्थानिक अतिरेक्याचं नाव हे आदिल ठोकर असल्याची माहिती समोर आली आहे. तर हल्ला झाला त्यावेळी पहिल्यांदा दोन अतिरेक्यांनी गोळीबार केला. त्यानंतर बॅकअपमध्ये असलेल्या दोन अतिरेक्यांनी हल्ला केला. दरम्यान, लोकल फोटोग्राफरने एक व्हिडीओ शूट केला आहे. त्यानुसार चार अतिरेक्यांची ओळख देखील पटली आहे. जंगलाच्या रस्त्याने तब्बल २२ तास पायी चालत अतिरेकी पहलगामच्या बैसरन येथे आले होते. AK-47 आणि M4 असॉल्ट रायफलचा वापर करत पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात अतिरेख्यांनी गोळीबार केला. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्लेखोरांनी पर्यटकांचे दोन मोबाईल फोन खेचून घेतले. तर ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या घटनास्थळावरून काडतूस देखील जप्त करण्यात आले आहे.

Published on: Apr 28, 2025 02:31 PM