Jayant Patil : मी राजीनामा दिलाच नाही… भाजप प्रवेशाच्या चर्चांवरही जयंत पाटील स्पष्टच म्हणाले….

Jayant Patil : मी राजीनामा दिलाच नाही… भाजप प्रवेशाच्या चर्चांवरही जयंत पाटील स्पष्टच म्हणाले….

| Updated on: Jul 15, 2025 | 10:36 AM

सध्या जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या बातम्या आणि भाजप प्रवेशाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या इतर नेत्यांनीही या बातम्यांचे खंडन केले आहे

गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील यांच्या राजीनाम्याबाबत माध्यमांमध्ये अनेक बातम्या येत होत्या. मात्र, खुद्द जयंत पाटील यांच्यासह पक्षाच्या इतर नेत्यांनी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे यांनी या बातम्यांचे खंडन केले आहे. जयंत पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. यासोबत त्यांनी भाजपच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांवर भाष्य केले आहे. जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चांगल्याच गाजत आहेत. यावर जयंत पाटील यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेशाची चर्चा पूर्णपणे फेटाळून लावली आहे. त्यांनी म्हटले की, भाजपात प्रवेश करण्यासाठी कुणी मला विचारलेले नाही आणि मी कुणाला विनंतीही केली नाही. एखाद्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या एवढ्या वावड्या उठण्याचे कारण काय? मी कुठे जाणार? हे माध्यमांनीच ठरवून टाकले.

दरम्यान, १६ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे, जिथे नेतृत्वातील संभाव्य बदलांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. जयंत पाटील यांनी यापूर्वी पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 15, 2025 10:33 AM