Jayant Patil | पश्चिम महाराष्ट्रातील पूर स्थितीबाबत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा : जयंत पाटील

| Updated on: Jun 19, 2021 | 2:25 PM

जलसंपदा विभागाचे सचिव आणि अधिकारी यांना घेऊन ही चर्चा होणार आहे. कृष्णा नदीचा महापूर आणि त्यातून अलमट्टीच्या पाण्याचे नियोजन, महाराष्ट्रातल्या कृष्णा खोऱ्यातील व कर्नाटकच्या कृष्णा खोऱ्यातील जनतेला जे नुकसान सोसावे लागते त्यापासून कमीत कमी कसं नुकसान होईल आणि पूरनियंत्रणाचं काम दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कसं चांगलं होईल यादृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Follow us on

सातारा, सांगली, कोल्हापूर भागात 2019 मध्ये आलेल्या पुराची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून आम्ही कायमच प्रयत्नशील आहोत. मागील वर्षी देखील राज्याच्या जलसंपदा विभागाने पाण्याचे सुव्यवस्थित नियोजन करून पूर परिस्थिती टाळली होती. पूर परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून यापूर्वी कर्नाटक राज्यासोबत मुख्य अभियंता व सचिव स्तरावरील चर्चा झालेल्या आहेत. याबाबतीतच मी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची भेट घेणार आहे, असं जयंत पाटलांनी सांगितलं होतं.

जलसंपदा विभागाचे सचिव आणि अधिकारी यांना घेऊन ही चर्चा होणार आहे. कृष्णा नदीचा महापूर आणि त्यातून अलमट्टीच्या पाण्याचे नियोजन, महाराष्ट्रातल्या कृष्णा खोऱ्यातील व कर्नाटकच्या कृष्णा खोऱ्यातील जनतेला जे नुकसान सोसावे लागते त्यापासून कमीत कमी कसं नुकसान होईल आणि पूरनियंत्रणाचं काम दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कसं चांगलं होईल यादृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. यापूर्वी सचिव स्तरावर बैठक पार पडली आहे आणि आता मंत्री स्तरावर होत आहे. शेजारील राज्याशी संवाद चांगला कसा होईल हा प्रयत्न असणार आहे, असेही त्यांनी सांगितलं होतं.