Jayant Patil | असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
28 जानेवारीला अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आणि बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला. अजित दादांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठे बदल घडून आले. अचानक झालेल्या राजकारणातील बदलामुळे अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अजित दादांच्या विमान अपघातावर एक मोठं विधान केलं आहे.
28 जानेवारीला अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आणि बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला. अजित दादांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठे बदल घडून आले. अचानक झालेल्या राजकारणातील बदलामुळे अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अजित दादांच्या विमान अपघातावर एक मोठं विधान केलं आहे. माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, अपघात झालेल्या ठिकाणी असणाऱ्या सरपंचाचा व्हिडिओ मी पाहिला आणि त्या व्हिडीओ मध्ये कधी नव्हे ते, वरून येणाऱ्या विमानाचा वेगळाच आवाज आला आणि बघता बघता ते विमान खाली आलं आणि गिरट्या घालून खाली पडलं. असं कधी घडतांना आम्ही पाहिलं नाही, त्यामुळे असं कसं होऊ शकतं? असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला आहे. नेमका विमानात काय बिघाड होता यावर चौकशी सुरु आहे लवकरच गोष्टी समोर येतील अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
